शिर्डीतून डॉ. रामचंद्र जाधव उमेदवारीची करणार ! प्रकाश आंबेडकरांचीही घेतली भेट…

0
381

श्रीरामपूर : लोकशाही ही अधिक सक्षम होण्यासाठी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उदात्त हेतूने भारतीय संविधानाची निर्मिती केली त्या ध्येय्याला न्याय देऊ शकेल असे उच्च शिक्षित आणि तळागाळाची अनुभवशील जाणीव असणारे लोकप्रतिनिधी हवेत, असे अभ्यासू, लोकसपर्क, माहितगार, चळवळीतील विचारवंत, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार असे माजी शिक्षणाधिकारी डॉ. रामचंद्र नामदेवराव जाधव यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हा गौतम बुद्धाचा आदर्श समोर ठेवून उमेदवारी करावी अशी अपेक्षा श्रीरामपूर,शिर्डी, राहाता, कोपरगाव, राहुरी, संगमनेर, अकोला परिसरातील जाधव स्नेहमित्र परिवारातर्फे करण्यात आली असून. मागील काही दिवसांपूर्वी डॉ. रामचंद्र जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले असून. शिर्डीच्या जागे संदर्भता येत्या ३ – ४ दिवसात वंचित आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने जाधव यांच्या भेटी नंतर चर्चेला उधाण आलाय. डॉ. रामचंद्र नामदेवराव जाधव यांचे बालपण श्रीरामपूर परिसरात गेले. टिळकनगर येथे ते वास्तव्य करीत होते. रयत शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या अंधारातून प्रकाशाकडे हे आत्मचरित्र प्रकाशित आहे. त्यांचा परिसरात मोठा मित्रपरिवार, नातेसंबंध आहेत. त्यांना परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक इत्यादी क्षेत्राची पूर्ण माहिती आहे, आपला माणूस आपल्या हितासाठी ही जाणीव ठेवून ते योग्य लोकप्रतिनिधी ठरतील. डॉ जाधव यांनी शिर्डीची उमेदवारी करून लोकमनाला पसंती देऊन शिर्डी लोकसभा लढवावी, त्यांना येथील मतदार चांगली पसंती देतील असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here