अबब … आदीकांनी भर चौकात दिला ;राष्ट्रवादी नगरसेवका पतीची मेनरोडवर चोप.

0
19849

श्रीरामपूर : शहरातील मेनरोड परिसरात असलेल्या. साईसुपर मार्केट याठिकाणी,एका म्युजिकल क्लासेसचा उदघाटन समारंभ,आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यासह राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढून नेहमी सोशल मीडियावर अपडेट राहणारे ,प्रभाग १२ मधील नगरसेविका अक्सा पटेल यांचे पती अल्तमश पटेल, हे आलेल्या नेत्यांसोबत फोटो काढण्यासाठी पुढे पुढे करत असतांना, शहरातील एका प्रतिष्ठित जेष्ठ व्यापाऱ्याशी हुज्जत घातल्याने, संतप्त झालेल्या आदिक कुटुंबातील एका सदस्यांने भर अल्तमश पटेल याची, मेनरोडवर यथेच्छ धुलाई केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

यापूर्वी १० एप्रिल २०२१ रोजी पालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनात,युवानेते सिद्धार्थ मुरकूटे आणि अल्तमश पटेल यांच्यात वाद झाला होता.त्यावेळी याच माजी नगराध्यक्षा आदीकांनी,” I am with my baby brother .. Altamash your insult is my insult ” अशा शब्दात पटेल यांचे समर्थन केले होते. त्याच अनुराधा आदिक यांच्या कुटुंबातील व्यक्तीने, भर चौकात जेव्हा लाथा बुक्क्याखाली लोळू लोळू अल्तमश पटेल यास बेदम मारहाण केली,यावेळी काही लोकांनी मध्यस्थी घालत सोडवा सोडवी करत, जमिनीवर पडलेल्या पटेल यास उचलून, वाद वाढण्या आगोदर मेनरोवरून पलायन करून घेऊन गेले. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी नगरसेवका पतीला मेनरोडवर, आदिकांकडून धुलाई झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

83% LikesVS
17% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here