दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? ना आजी ना माजी उत्कर्षा मारतील का बाजी ?

आजी खासदारावर गद्दारीचा तर माजीवर ट्रिपल गद्दारीचा जनतेचा आरोप! शिर्डीच्या मतदारांची दोघांवरही नाराजी

0
483

शिर्डी (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची रंगत आता खऱ्या अर्थाने दिसून येत असुन शिर्डी मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत असून सर्वच प्रमुख उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहे.अशा परिस्थतीत मतदारांकडून आजी खासदाराचा गद्दार ,माजी खासदाराचा ट्रिपल गद्दार म्हणून उल्लेख केला जात आहे . शिर्डी मतदारसंघातील मतदारांची महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर प्रचंड नाराजी दिसून येत असून मतदारांनी तिसरा पर्याय म्हणून वंचितचा पर्याय निवडला तर दोन्ही उमेदवार अर्थात आजी-माजी खासदारांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुती महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते शिर्डीत ठाण मांडून बसले आहेत. सर्वच जण आपपल्या परिने फिल्डींग लावत आहे. अशातच महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्यासाठी मुख्यमंत्री आठवड्यातून दोनवेळा आले आहे तर दादा भुसे यांनी शिर्डी मतदार संघातील महायुतीच्या नेत्यांच्या , पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी व बैठकांचा जोर वाढविला आहे. त्यालाच आव्हानात्मक उत्तर म्हणून महाविकास आघाडीकडून संजय राऊत यांनीही आपल्या सभेतून आपली ताकद दाखवून दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे राज्यभरातील पदाधिकारी यांनीही घरोघरी जाऊन प्रचारात आघाडी घेतली आहे.
शिर्डी मतदार संघात तीन ही उमेदवार आपले शक्ती प्रदर्शन करतांना दिसत आहे. तर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.जसे की,महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी मतदार संघातून निवडून आणण्यासाठी  मा. मंत्री बाळासाहेब थोरात व संजय राऊत यांनी पुढाकार घेतला असून दुसरीकडे सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.तर वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांना निवडून आणण्यासाठी ऍड प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डी मध्ये आपली प्रचंड ताकत लावली असल्याचं दिसत आहे.पहिल्यांदाच वंचित आघाडीने शिर्डी मतदार संघात महिला उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी दिली आहे. 
शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर मतदार संघात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून दोनवेळा निवडून गेल्यावर गेल्या १० वर्षात लोखंडे यांनी तोंड दाखवलं नाही की, कुठलेही ठोस कामे मतदार संघात केले नाही त्यामुळे लोखंडे गद्दार आहेत असा आरोप त्यांच्यावर अनेक गावात केला जात आहे.त्याच बरोबर शिर्डी मतदार संघात त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी यांनी लोखंडे यांना उमेदवारी देण्यासाठी विरोध दर्शविला होता. त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील माजी आमदार स्नेहलता कोल्हे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील लोखंडे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरविली असून यामुळे लोखंडे यांची चांगलीच धांदल उडाली आहे.कोपरगाव तालुक्यात असणारी गावे व त्यांच्याद्वारे होणाऱ्या मतांवर लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे हे सर्वश्रुत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हे यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच संभाव्य धोका ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना खास शिर्डी कडे लक्ष केंद्रित करावे लागते आहे. जनता मला बघून नाही ,तर मोदीजींना बघून मला निवडून देतील असा आत्मविश्वास लोखंडे यांनी व्यक्त करतांना दिसत आहे. त्यांना बघून निवडून दिले तर मतदारसंघाचा खरंच विकास होईल का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.त्यांचं बरोबर महविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील पक्ष बदली मुळे मतदार संघात गद्दार म्हणुन आरोप केला जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेच्या जोरावर माजी आणि आजी खासदारांना जनतेने निवडून दिले होते.परंतु बदलत्या राजकारणामुळे दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी पक्ष बदलण्याची भूमिका घेतल्याने मतदार संघात दोन्ही उमेदवारांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.
यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार की काय असत दिसत आहे.
कंटाळलेली जनता तिसरा पर्याय म्हणून उत्कर्ष रूपवते यांना मतदान करणार का ? भीमसैनिक आठवलेंना उमेदवारी नाकारल्याचा बदला घेणार का? शिर्डी मतदार संघातील जनता तरुण तडफदार महिलेला संधी देणार का? नेट मोठमोठे नेत्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून आजी-माजी खासदारांना निवडून येण्यासाठी आव्हान केले असले तरी परंतु एकाच नाण्याच्या दोन छापा काटा असलेल्या या खासदारांना मतदार राजा मतदान करणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे 4 जूनला मिळणार असून त्याची उत्सुकता मात्र सर्वसामान्यांना लागून आहे.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here