नगर दक्षिणमधून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे सुदर्शन शितोळे निवडणुकीच्या रिंगणात

0
341

अहमदनगर :  हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी नगर दक्षिणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखला केला. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांनी सुदर्शन शितोळे यांना उमेदवारी जाहीर केली. हिंदू एकता आंदोलन पक्ष ही सुरुवातीला एक संघटना होती. स्थापनेपासून हिंदूंच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठविला. ३७० वे कलम रद्द करणे, अयोध्ये राम मंदिर बांधणे, समान नागरी कायदा करणे आदींसह शेतकरी व कामगार हिताच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती. या संघटनेचे रुपांतर पुढे वाढत जावून पक्षात झाले. आज पक्षाच्या जिल्ह्यात १५५ शाखा असून हजारो कार्यकर्ते  असल्याचे शितोळे यांनी सांगितले. शिवसेने हिंदुत्व सोडले आहे तर भाजपचे हिंदुत्व संपलेले असून आता हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच खरे हिंदुत्व राहिल्याची जाणीव विश्वास व्यक्त होत आहे. दक्षिण नगर मतदारसंघातील कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, अ.नगर तालुका राहुरी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी पक्षाचे उमेदवार सुदर्शन आण्णा शितोळे यांच्यासाठी अहोरात्र काम करणार असल्याचे सांगितले असून त्यांना निवडून आणण्याचे काम जनताच करणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.दिसत असल्याने गेली ३५ वर्षे महाराष्ट्रात पक्षाची बांधणी करून १२ जिल्हे व ४५ तालुक्यामध्ये या पक्षाची ताकद आहे. दोन दिवसांपूर्वी नगर, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर या मतदारसंघातून शितोळे यांनी दौरा केला असून त्यांना मोठा पाठिंबा दिसून येत आहे. यामुळे ही लढत आता बहुरंगी होणार असून जनतेचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. यावेळी संपूर्ण नगर जिल्ह्यातून नगर जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, राहुरी तालुका अध्यक्ष सोपानराव पागिरे, नगर तालुकाप्रमुख विलास लष्करे, कार्याध्यक्ष चिलिया तुवर, नगर शहरप्रमुख राजेंद्र पारधे, जिल्हा संपर्कप्रमुख अमीर जहागिरदार, मुकुंदनगर शाखाप्रमुख नजीर इनामदार, बी.एम.पवार, पाथर्डी तालुकाध्यक्ष ईश्वर लोणारी, उमेश सुपेकर, नगर उपाध्यक्ष विलास चव्हाण, नगर शहर उपाध्यक्ष कल्याण सावंत, जळगाव जिल्हाप्रमुख वसंत देवकर, जिल्हा संपर्कप्रमुख अशोक जाधव, ग्रामीण पुणे जिल्हाप्रमुख विजय जगताप  व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

67% LikesVS
33% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here