पालकांनी पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावेः प्रा.साईनाथ कानडे

0
899

पुणे/प्रतिनिधी (शौकत मुजावर) :- हल्ली ग्रामीण भागातील शेतकरी पालक वर्ग वर्षभर कामात व्यस्त आसतो. आपल्या कुटूबाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आसताना पाल्यांच्या शिक्षणाकंडे त्या ला कमी जास्त प्रमाणात लक्ष देणे जमत नाही . त्यामुळे मुलांचे शिक्षणा तील प्रगती ढासळते त्याचा दोष पाल्यांना न देता त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देत संवाद साधत येणाऱ्या अडचणी जाणून घ्यावेत. त्यांना शिक्षणासाठी अवश्यक त्या सोयी प्राप्त करूण दयाव्यात. तरच त्याचा शैक्षणिक दर्जा उचावेल असे प्रतिपादन प्राचार्य साईनाथ कानडे सरांनी केले.
टाकळी हाजी येथील पर्ल कोचिंग क्लासेस येथे झालेल्या विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा नुकताच संपन्न झाला.यामध्ये असंख्य विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवत या मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घेतला.
प्रशिक्षक बेल्हेकर सरांनी २०१० रोजी पासुन यशाची परंपरा आसलेल्या पर्ल कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यानच्या यशाच्या गाथा विद्यार्थ्याना सांगितल्या.मुलीच्या स्वतंत्र बॅचेस,अनुभवी शिक्षक, विविध विषयांचे अभ्यास वर्ग यामुळे टाकळी बेट भागात या प्रशिक्षण वर्गाचे कौतुक होत असुन पालक देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.
या मार्गदर्शन मेळाव्याचे अयोजन प्रा. साईनाथ कानडे सरांनी प्रस्तावना बेल्हेकर आभार प्रदर्शन कु.घोडे मॅडम यांनी केले.
या प्रसंगी पालक, विद्यार्थ्यानसह बेलोटे सर, प्रशांत गावडे ,मलभरे सर,सौ.गाडीलकर मॅडम, सालके मॅडम, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

91% LikesVS
9% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here