मोठी बातमी : आगामी निवडणुकीतील ससाणे – मुरकुटे युतीवर शिक्कामूर्तब.

0
12757

श्रीरामपूर : १६ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकी संदर्भात, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली, लोकसेवा पॅनलच्या माध्यामातून, आगामी होऊ घातलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविणार असल्याची माहिती, माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. माजी नगराध्यक्ष व नगरसेवक संजय फंड यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी, तालुक्याचा विकासगाडा अविरत पणे चालावा या करिता, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले राजकीय वाद बाजूला ठेवून

तालुक्यातील जनतेच्या हिताकरिता अशोक च्या निवडणुकीत माजी आमदार मुरकुटे यांच्या लोकसेवा पॅनला, माजी आमदार स्व जयंतराव ससाणे यांना मानणारा गट तसेच काँग्रेस पक्षाच्या जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी जाहीर केले. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ससाणे गट व काँग्रेससह जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत, आणि जो येणार नाही त्याच्या शिवाय, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा सर्व निवडणुकीत ससाणे व मुरकुटे दोघेही तालुक्याच्या विकासाकरिता एकत्र राहतील, असे जाहीर केल्याने, जिल्हा बँकेच्या निवडणुकी नंतर ससाणे मुरकुटे यांच्यातील युतीवर शिक्कामूर्तब झाला आहे.

69% LikesVS
31% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here