गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या मकासरेला तडीपार कराअ.भा.छावा महिला आघाडी जि.प्रमुख सुरेखाताई सांगळे

0
2731

अहमदनगर(प्रतींनिधी) – अखिल भारतीय छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या अहमदनगर जिल्हाप्रमुख सुरेखाताई सांगळे यांनी पोलिस अधिक्षक श्री.मनोज पाटील साहेब यांना समक्ष भेट घेवून राहुरी परिसरात विचित्र मनोवृत्ती असलेला विजय अण्णासाहेब मकासरे हा तरुण मागासवर्गीय समाजातील असल्याचा धाक दाखवून अट्रोसिटी गुन्ह्याच्या नावा खाली अनेक सर्वसामान्य नागरिक तथा सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावत असतो.या व्यक्तीवर पहिलेच विनयभंग,सरकारी कामात अडथळा या सह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.अ.भा.छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मराठा क्रांति मोर्चाचे समन्वयक देवेंद्र लांबे यांच्यावर केलेल्या हल्या सबंधात चर्चा करून तात्काळ विजय मकासरे याला अटक करून जिल्हा बंदी करण्याची मागणी केली आहे.यावेळी नगर तालुका प्रमुख किरण फटांगरे,द.जिल्हा सचिव गणेश गायकवाड उपस्थित होते.

सुरेखाताई सांगळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,अखिल भारतीय छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्र भर खोट्या अट्रोसिटी गुन्ह्यांच्या विरोधात काम करत असते.त्याच अनुषंघाणे आमच्या संघटनेचे अहमदनगर जिल्हा कार्यध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देवेंद्र सिताराम लांबे पा. हे सामाजिक कार्यासोबत खोट्या अट्रोसिटी गुन्ह्यांच्या विरोधात आवाज उठवत असतात, याचा राग मनात धरून राहुरी येथील विजय अण्णासाहेब मकासरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने शुक्रवार दि.०६/०८/२०२१ रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान राहुरी परिसरात देवेंद्र लांबे पा.यांच्या डोक्याला कट्टा लावून धमकी देत खिशातील २५०००/- रोख व एक सोन्याची अंगठी लंपास केली आहे.तसेच सामाजाचे काम करू नये अन्यथा तुझ्यावर अट्रोसिटीचा गुन्हा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवेंद्र लांबे पा.यांना दिली आहे.

संबंधित मकासरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आहे.या व्यक्तीवर राहुरी पोलिस ठाण्यात देवेंद्र लांबे यांनी भादवि. ३९२,३४१,५०४,५०६,३४,३,२५ अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे.

यापूर्वी देखील मकासरे विजय अण्णासाहेब या इसमावर

१) राहुरी पो.स्टे.२९७/२०१५ मु.पो.अॅक्ट३७(१)(८)१३५,

२)राहुरी पो.स्टे.१७४५/२०२० IPC ३५३,५०४,५०६

३)श्रीरामपूर शहर ४८४/२०१९ IPC ३५३,३३२,३६८,२८३,१८८

४) श्रीरामपूर १६१/२०१९ IPC ४२०,४९६,३४७,५०६,३४

५)शिर्डी पो.स्टे.२६/२०१८ IPC ३७६,४९५,३२३,५०६ गुन्हे दाखल आहेत.

अशा समाज विघातक मनोवृत्ती असणाऱ्या व्यक्तीला अहमदनगर, पुणे,नाशिक या जिल्ह्यातून तडीपार करून शस्त्र बंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

संबंधित प्रकरणातील विजय अण्णासाहेब मकासरे याच्यावर प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास “छावा” स्टाईलने आंदोलन करण्यात येईल,होणार्‍या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर जिल्हा प्रमुख नितिन पटारे,राज्य कार्यकार्‍यांनी सदस्य अशोक चव्हाण, शेतकरी नेते नितिन दादा बनकर,राहुरी ता.प्रमुख रमेश म्हसे,मेजर रावसाहेब काळे,विद्यार्थी आ.जि.प्र. सचिन खंडगळे,जि.संपर्क प्र.किशोर शिकारे आदीच्या सह्या आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here