संगमनेरात २ अल्पवयीन मुलांना रस्त्यात आडून बेदम मारहाण,एकाची प्रकृती चिंताजनक.

0
55

संगमनेर : शहरातील मोगलपुरा येथील फैज अहमद कुरेशी वय वर्ष १९ व जुनेद कुरेशी वय वर्ष १८ हे दोघे सायंकाळी रमजान चा उपास सोडल्या नंतर नजीकच्या मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी जात असतांना. उचलून हात उसने पैसे परत मागीतल्याचा राग मनात धरून शहदाब निसार शेख व त्याच्या ४ ते ५ साथीदारांनी परिसरातील मौलाना अबुल कलाम आझाद हॉल मागील अंधाराचा फायदा घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांना रस्त्याने अडवून लोखंडी रॉड तसेच फायटर यांच्या खाली बेदम मारहाण केल्याची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरातील लोकांनी जखमी अवस्थेतील दोन्ही मुलांना शहरातील एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यातील जखमी जुनेद कुरेशी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिलीय. दोन्ही अल्पवयीन मुलांना मारहाण करणारा शहदाब शेख हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात संगमनेर, लोणी,तळेगाव, अश्व,चंदनापरी याठिकाणी गोवांशीय जनावरांची तस्करी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल असून. आशा गुन्हेगारांना हद्दपार करावा अशी मागणी जखमी मुलांच्या घरच्यांनी केलीय…

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here