लोखंडेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार- चौधरी

0
349

शिर्डी- लोकसभा मतदार संघाची महायुतीची उमेदावारी खासदार सदाशिव लोखंडे यांना जाहीर झाली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर मुख्यमंत्र्याचे विशेष प्रेम असल्याने त्यांचा उमेदावारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती संपर्क नेते व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. शिर्डी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने चौधरी उपस्थित होते. बैठकिला संबोधित करताना चौधरी यांनी सांगितले की, महायुतीने ४५ जागा जिंकून आणण्याचा नारा दिला आहे. त्या अनुषंगाने खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करायचे असून प्रचारात कोणत्याही प्रकारती कसर राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना चौधरी यांनी केल्या.  कोविडच्या काळामध्ये खासदार निधीच दिला जात नव्हता, त्यामुळे अनेक कामे रखडली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर त्याची भर काढून देण्यात आली. मोठ्या प्रमाणात मतदार संघात निधी दिला गेला. निळवंडेसारखे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार आशुतोष काळे, किरण लहामटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, आण्णासाहेब म्हसके, सिताराम गायकर हे सर्व मनापून सोबत असल्याने दोन लाखांच्या मताधिक्याने विजय निश्चित आहे. भाजप, राष्ट्रवादीचे, आरपीआय महायुतीचे कार्यकर्तेही अर्ज दाखल करण्याच्या दिवशी उपस्थित राहणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. विरोधकांनी कोणत्याही खालच्या थराला जावून जरी प्रचार केला तरी, शिर्डी मतदार संघातील जनता सुज्ञ आहे, ती भुलथापांना बळी पडणार नाही. येथे पुन्हा शिवसेनेचाच भगवा पडकणार असल्याचा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला. या बैठकीच्या निमित्ताने प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव श्रीकांत डेरे,जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीनराव औताडे, संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, विठ्ठल घोरपडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

75% LikesVS
25% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here