माळवाडगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवजयंती उत्साहात

0
56

श्रीरामपूर/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील माळवाडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. माळवाडगाव येथील जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी लोकसेवा मंडळाचे बबनराव आसने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी युवा नेते योगेश आसने व दिलीपराव हुरुळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी नारायण थोरात, किशोर तांबे, विठ्ठल निंबाळकर, जगदंबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक संदिप आसने, अध्यक्ष सतीश आसने, उपाध्यक्ष अतिश आसने, प्रदीप आसने, शोयब पठाण, प्रमोद आसने, गौरव आसने, दत्तात्रय गाढे, पिंटू अनुसे आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here