भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी आसने यांची निवड

0
60


माळवाडगाव/प्रतिनिधी येथील प्रथितयश वकील ॲड.विलास (बापूसाहेब) गणपतराव आसने यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली. वकिलीसह सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहे. त्यांनी श्रीरामपूर न्यायालयात १९९९ ला वकिली सुरू करत १९९९ ते २००४ या काळात श्रीरामपूर न्यायालयात त्यांनी वकिली केली त्यानंतर शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात विधी अधिकारी म्हणून २००४ ते २०१५ काम केले. तसेच २०११ ते आज पर्यंत ते राहता न्यायालयात वकिली करत आहे. माळवाडगाव येथील प्रगतशील शेतकरी गणपतराव आसने यांचे ते चिरंजीव तर प्रगतशील शेतकरी इंजि.बबनराव आसने व डॉ.राजेंद्र आसने यांचे ते बंधू आहे.अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून धेय्य साध्य केले आहे.

विलास आसने यांच्या भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्तीबद्दल श्रीरामपूर व शिर्डी परिसरातील सामाजिक संघटना व वकिल संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here