शहर पोलिसांची कारवाई गावठी कट्टा,२ जिवंत कडूतुसासह आरोपी गजाआड.

0
318

श्रीरामपूर : पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रा विरोधात कारवाईचे आदेश दिल्याने. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी, तात्काळ गुन्हे तपास पथक रवाना करून. जानेवारीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास, शहरातील दत्तनगर हद्दीतील एम आय डी सी परिसरात,आरोपींकडे अग्निशस्त्र असल्याचे माहीत असतांनाही, आपल्या जिवाची पर्वा न करता,जिगरबाज कारवाई करून.आरोपी रईस शेरखान पठाण वय वर्ष ३० राहणार रांजणखोल, तालुका राहता यास गजाआड केले असून. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध जबरी चोरी,अवैध अग्निशस्त्र बाळगणे त्याच बरोबर गंभीर हाणामारीचे ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती,तपासा दरम्यान समोर आली असून. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता,आरोपी रईस पठाण यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात,आर्म एक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या आदेशावरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे,पोलीस नाईक साईनाथ राशिनकर, पो.ना. रघुनाथ कारखेले, मच्छिंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड,राहुल नरवडे, रमिझराजा अत्तार,गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे,गौरव दुर्गुळे,बाळासाहेब गुंजाळ, ज्ञानेश्वर गुंजाळ, आंबादास आंधळे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव आदींनी यशस्वीपणे केली असुन. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here