सुलतान नगर परिसरात, २० वर्षीय युवकावर धारदार शास्त्राने वार.

0
744

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर परिसरात असलेल्या, सुलतान नगर येथे सकाळी साडे ११ वाजेच्या सुमारास, राहुल दीपक मंगलम या २० वर्षीय युवकावर, याचा परिसरात राहत असलेल्या, मोहन अजय शर्मा या अंदाजे २० वर्षाच्या मुलाने, मागील काही दिवसांपासून खुन्नशीने बघत असल्याच्या कारणावरून, चाकूने डोक्यावर, गळ्यावर तसेच छातीवर वार केल्याची घटना घडली, सदर घटनेसंदर्भात पोलीस निरीक्षक संजय सानप यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी पोलीस रवाना केले.

त्यानंतर जखमी अवस्थेतील राहुल मंगलम यास,साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले, तसेच या हल्ल्यातील आरोपी , मोहन आडागळे यास तात्काळ ताब्यात घेतले असून, या गुन्ह्या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, राहुल मंगलम हा बजरंग चौक येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत असून, तो भंगार गोळा करण्याचे काम करतो, दरम्यान आज सकाळी आरोपी मोहन याने दारूला पैसे मागितले असता, त्यास पैसे न दिल्याने आरोपीने चाकूने मारहाण केल्याची माहिती दिल्याने, आरोपी मोहन अजय शर्मा याच्या विरुद्ध, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भदवी कलाम ३०७,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here