वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळावी यासाठी चव्हाण कुटुंबीयांची नगरपालिकेसमोर उपोषण

0
738

श्रीरामपूर/प्रतिनिधी :-  वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळविण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्वतःच्या कुटुंबीयांचं श्रीरामपूर नगरपालिका समोर उपोषण करण्याची वेळ आली आहे ज्ञानेश्वर रामचंद्र चव्हाण ये श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये वसुली विभागात काम करत होते मार्च 2018 मध्ये ते सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांना 24 वर्ष कालबद्ध पदोन्नती तसेच सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात आला परंतु या लाभाची रक्कम त्यांना तीन वर्षे उलटून देखील अद्याप पर्यंत मिळाले नसल्याने त्यांनी मागील एक वर्षापासून नगरपालिकेकडे लेखी तोंडी मागणी केली मात्र याकडे श्रीरामपूर नगरपालिकेने दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांनी नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा दिला मात्र या गोष्टीकडे लिखित श्रीरामपूर नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने आज 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत श्रीरामपूर नगरपालिकेत समोर उपोषण सुरू केले विशेष म्हणजे उपोषण सुरू केल्यानंतर श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष तसेच सत्ताधारी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी उपोषण करताना कडे पाठ फिरविली उपोषणाची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाने मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन कोरे यांनी उपोषणकर्त्यांची कडे धाव घेऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवला तसेच यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष करण ससाने म्हणाले की श्रीरामपूर नगर पालिकेच्या एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आपल्या स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी नगरपालिके समोर आपल्या कुटुंबीयांचं उपोषण करावे लागते हे या नगरपालिकेचे दुर्दैव म्हणावे लागेल असेही यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले तर मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष मोरे म्हणाले की आजचा दिवस हा श्रीरामपूर नगरपालिकेच्या इतिहासातील काळा दिवस समजावे लागेल कारण ज्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर आज नगरपालिकेचा कारभार चालतो त्याच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अशी वेळ येते ही खरंच खूप दुर्दैवाची बाब आहे आणि त्यामुळेच आजचा दिवस श्रीरामपूर नगर पालिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावे लागेल असे यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे म्हणाले यावेळी विविध सामाजिक संघटना नेते ज्ञानेश्वर रामचंद्र चव्हाण यांच्या सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा दर्शविला

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here