अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन.

0
297

शिर्डी- श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी आणि भारत सरकार सुचना एवं प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर क्षेत्रीय येथील राष्ट्रीय यांचे संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी २५ जुलै रोजी “हर घर तिरंगा” या उपक्रमा अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी भगतसिंग,राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं.नेहरू लोकमान्य टिळक, भारत माता आणि मौलाना आझाद यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये सहभाग घेतला.या रॅलीचे उदघाटन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते करण्यात आले.

या रॅलीचे सांगता प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्या बद्दल ‘७५’ हा अंक तयार केला आणि महाविद्यालयामध्ये आणून रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीचे उदघाटन प्रसंगी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर येथील माधव जायभाये, पी.शिवकुमार , प्राचार्य विकास शिवगजे, गंगाधर वरघुडे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.मुबीन शेख यांचे सह राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. रॅली नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. अमृत महोत्सव अंतर्गत “ हर घर तिरंगा ” रॅली याबाबत माहिती सांगताना प्राचार्य विकास शिवगजे म्हणाले, शासनाचे आदेशानुसार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या घरा शेजारील चार नागरिकांना तिरंगा ध्वज देऊन सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवा यासाठी प्रयत्न करणार आहेत.त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थीही शहरातील प्रत्येक घरात जाऊन याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रा.वंदना झरेकर यांनी सुत्रसंचालन केले तर सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.मुबीन शेख यांनी आभार व्यक्त केले.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here