नगराध्यक्षांच्या सुचना होताच, छत्रपती राजे संभाजी चौक अतिक्रमण मुक्त.

0
957

श्रीरामपूर : शहरातील बेलापूर कॅनॉल ते मोरगेवस्ती रोडवर ४ ते ५ रुगणालाय तसेच याचा मार्गावरून शिर्डी बायपास असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते, याच रस्त्यावर असलेल्या छत्रपती राजे संभाजी चौकात मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते, काही हातगाड्या तसेच भाडे तत्वावर मिळणाऱ्या ४ चाकी वाहनांमुळे, या परिसरतील नागरिकांना रस्त्यावर जा ये करण्यासाठी तारेवरची कसरत करावा लागत असल्याने, या परिसरातील रहिवाश्यानी,श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्याकडे, तक्रार केल्याने ,पालिकेच्या कर्तव्यदक्ष लोकनियुक्त नगराध्यक्षा आदिक यांनी तात्काळ पालिकेच्या अतिक्रमण विभागास, छत्रपती राजे संभाजी चौकातील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले, सदर आदेशाची अंमलबजावणी करत पालिकेचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी, छत्रपती राजे संभाजी चौकातील भाजीवाले, हातगाडी तसेच भाडे तत्वावर मिळणाऱ्या ४ चाकी वाहने काढल्याने, अनेक वर्षांपासून अतिक्रमनाच्या विळख्यात अडकलेल्या, छत्रपती राजे संभाजी चौकाने मोकळा श्वास घेतला आहे, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने, तत्परता दाखवून केलेल्या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here