एकाच दिवशी नवी दिल्ली व बजरंग चौकातील ६ ठिकाणी घरफोडया.

0
513

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर २ परिसरात बसलेल्या. नवी दिल्ली व बजरंग चौक परिसरात असलेल्या. ६ नागरिकांचे घरे फोडून, अज्ञात चोरट्यांनी घरातील स्टील,पितळाची भांडी,गॅस टाकी या मुद्देमाला सह. बजरंग चौकातील एक किराणा दुकान देखील, चोरट्यांनी फोडून दुकानातील पैसे व काही वस्तू लांबविल्याचा प्रकार. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. यासंदर्भात परिसरात चर्चा होताच, परिसरातील सामजिक कार्यकर्ते मनोज बागुल व भागातील नागरिकांनी शहर पोलिसांना घटने संदर्भात माहिती दिली. सदरच्या घटने संदर्भात माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे व गौतम लगड यांनी घटनास्थळी भेट देऊन.

ज्या ज्या ठिकाणी घरफोडी झाल, त्या त्या घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख देखील त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलविले. काही वेळात पोलीस निरीक्षक सानप हे घटनास्थळी दाखल झाले. सानप घटनास्थळाची पाहणी करीत असतांना. परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी केली. नवी दिल्ली व बजरंग चौकातील ६ ठिकाणी झालेल्या घरफोडी संदर्भात, संयुक्त फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात, भादवी कलम ४५७,३८० अन्वये अज्ञात चोरां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉस्टबल शफीक शेख हे करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here