शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिन साजरा.

0
248

श्रीरामपूर : ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून,सर्वत्र साजरा केला जात असतांना. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने, शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सदरचा कार्यक्रम पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी शहर पोलिसांनी मागील वर्षभरात केलेल्या कारवाईचा आलेख सांगितला. तसेच पत्रकार व पोलीस हे एकाच गाडीचे दोन्ही चाक असून. पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये चांगला संवाद असल्याने, पोलीस आणि पत्रकार हे दोघेही चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे जाहीरपणे सांगितले. यावेळी जेष्ठ पत्रकार व कामगार नेते नागेशभाई सावंत यांनी श्रीरामपुरातील पत्रकार हे चांगल्याला चांगले आणि वाईटला वाईट म्हणणारे आहेत. मात्र पत्रकारांना माहिती मिळण्या संदर्भातील अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी १५ वर्षांपूर्वीची आणि आजच्या पत्रकारितेतील फरक सांगतांना, पूर्वी संपादकांच्या नावाने पेपर ओळखला जायचा. मात्र आजच्या पत्रकारितेला नवे स्वरूप आल्याचे सांगतांना, डीवायएसपी संदीप मिटके यांनी ,श्रीरामपुरातील पत्रकार हे जागरूक ,निर्भीड आणि स्पष्टवक्ते असल्याची मत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रसिद्ध बांधकाम व्यासायिक के के आव्हाड,पत्रकार नागेशभाई सावंत,करण नवले,राजेंद्र बोरसे, शिवाजी पवार, नवनाथ कुताळ,बाळासाहेब भांड,प्रकाश कुलथे,जयेश सावंत, गौरव साळुंके,संदीप आसने,मनीषा थोरात,अस्लम बिनसाद, सायरा सैय्यद,बाबा वाघ आदींसह पत्रकार बांधव व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here