अल्पवयीन मुलीचा शोध लावा, शिवप्रहरचा पोलीस ठाण्यावर मोर्चा.

0
812

श्रीरामपूर : २३ जुलै २०२१ रोजी श्रीरामपूर तालुक्यातील राजकिय दृष्टया संवेशनशील समजल्या जाणाऱ्या, बेलापूर गावातील, एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला, एका गुन्हेगारी क्षेत्रातील विशिष्ट समाजाच्या मुलाने, फूस लावून पळून नेल्याची घटना घडली होती, या संदर्भात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन देखील,

अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून, पळून नेण्यात आलेली मुलगी,कुटुंबाच्या ताब्यात न मिळाल्याने, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाच्या घरच्यांच्या बाजून, शिवप्रहरच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन, शहर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जमलेला संतप्त जमावाच्या भावना लक्षात घेऊन, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी, या प्रकरणात मध्यस्थी घालत, अल्पवयीन मुलीचा तात्काळ शोध लावण्याकमी पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा शब्द दिल्याने, शिवप्रहरच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन, तुर्तात स्थगित करण्यात आल्याची माहिती, शिवप्रहरचे अध्यक्ष चंद्रशेखर आगे यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here