निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी घड़वले माणुसकीचे दर्शन ,अपघात ग्रस्त मित्रासाठी केले दिवस रात्र एक केली आड़ीच लाखाची मदत

0
429

निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी घड़वले माणुसकीचे दर्शन ,अपघात ग्रस्त मित्रासाठी केले दिवस रात्र एक केली आड़ीच लाखाची मदत

 महाराष्ट्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अमोल गणपत वाघमारे याचा अपघात झाला होता. डोक्याला व छातीला जब्बर मार लागल्यामुळे त्याला लातूर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. घरची आर्थिक परिस्थिती बीकट असल्यामुळे दवाखान्यातील खर्च झेपणारा नसल्याचे विद्यार्थांना लक्षात आल्यावर प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य तथा राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे मेजर डॉ. चंद्रकुमार कदम व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांच्याशी चर्चा करुन “एक हात मदतीचा” या उपक्रमाखाली आर्थिक मदत जमा करणाचे ठरविले. यातून 2,50,650. पैसे एवढी रक्कम जमा झाली. ही रक्कम विद्यार्थ्यांनी अमोल वाघमारे यांच्या आई-वडीलांकडे सुपूर्द केली. महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी दवाखान्यात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. स्वार्थी प्रवृत्तीने वागणा-या समाज जीवनात विद्यार्थ्यांनी दाखवलेली परोपकारी वृत्ती व त्यांच्या मनात निर्माण झालेल्या सामाजिक कार्याच्या जाणीवीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “एक हात मदतीचा” या कार्यात विद्यार्थी ढगे सायरन, जाधव संतोष, घायाळ वृंदावन, पोतदार आकाश, डिग्गे अजय, लाटे मयुरी, वाघमारे कार्तिक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जमा झालेली रक्कम प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. हंसराज भोसले यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

0% LikesVS
100% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here