पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात, समाजवादीचे आंदोलन.

0
662

श्रीरामपुर : २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकी वेळी, देशातील महागाई नियंत्रित करून, बेरोजगारी दूर करण्याचे आश्वासन देणा-या, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पेट्रोलच्या दराने, शतक पार केले असून, डिझेल व गॅसचे दर देखील दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यात देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतांना, सर्वांचीच आर्थिक परिस्थिती डगमगली आहे, यातच वाढत्या महागाईमुळे, सर्व हातावर पोट भरणा-या, तसेच मध्यम वर्गीय नागरिकांचे कंबरडे मोडकळीस आले आहे, जेथे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ढासळलेल्या असतांनाही, देशात मात्र पेट्रोल च्या दराने शंभरी पार केली आहे, तर डिझेल लिटर व गॅस सिलेंडर ९०० रुपयांपर्यंत गेले आहे. या दरवाढीस केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याने, देशभरातील इंधन वाढी विरोधात समाजवादी पार्टीच्या वतीने, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले, तसेच जर केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणून, वाढती इंधन दरवाढ कमी करावी,अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा, समाजवादीचे शहराध्यक्ष समीर शेख यांनी यावेळी दिला. सदरच्या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष जोएब जमादार, तसेच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here