आझाद टाकळीभान नामदार राधाकृष्ण विखे पाटील कबड्डी स्पर्धेचा मानकरी.

0
238

श्रीरामपूर : बेलापूर बुll ग्रामापचायतीच्या शतकपूर्ती निमित्ताने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या मान्यतेने गावकरी मंडळाने आयोजित केलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धेत आझाद, टाकळीभान चा संघ विजेता तर किरण गंगवाल मित्रमंडळ बेलापूर संघ उपविजेता ठरला. जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपच अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळ बेलापूर कबड्डी संघ व समस्त ग्रामस्थ बेलापूर बु-ऐनतपूर च्या सहकार्याने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामिण भागात प्रथमच मॅट वर कबड्डी स्पर्धा भरविण्याचा मान बेलापुर गावाने गावकरी मंडळाच्या माध्यमातून मिळवीला या स्पर्धा दिवस रात्र विद्युत प्रकाश झोतात जि.प.प्राथमिक शाळेच्या मैदानावर खेळविण्यात आल्या .या स्पर्धेचा भव्य उदघाटन सोहळा राज्याचे महसूल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते,जालिंदर कु-हे यांचे अध्यतेखाली तसेच भाजप ओबीसी राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे,जिल्हा संघटक नितीन दिनकर, अॕड.बाळासाहेब खंडागळे ,भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा,नानासाहेब शिंदे,डाॕ.नितीन आसने,भिमा बागुल,माजी नगरसेवक दीपक चव्हाण,रवी पाटील,रुपेश हरकल हाजी इस्माईल शेख ,प्रफुल्ल डावरे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेत आझाद, टाकळीभान संघाने प्रथम क्रमांक मिळवीला (रु.५१००० गावकरी मंडळ, बेलापूर पुरस्कृत),किरण गंगवाल मित्रमंडळ संघाने द्वितीय क्रमांक मिळवीला (रु.४१००० चव्हाण कंस्ट्रक्शन,श्रीरामपूर पुरस्कृत ),रणवीर, भेंडा संघाने तृतिय क्रमांक तर (रु.३१००० श्री. संजय शिंदे, बेलापूर पुरस्कृत )आणि जगदंबा, भोकर संघास चतुर्थ (रु.२१००० श्री. शफिक आतार, बेलापूर पुरस्कृत) क्रमांकाचे बक्षिस मिळाले याशिवाय उत्कृष्ट संघाचा पुरस्कार बेलापूर कबड्डी संघास(रु.५१०० बाळासाहेब दाणी पुरस्कृत), उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार (रु.५१०० कृष्णा कलेक्शन, पुरस्कृत) राहुल धनवटे या खेळाडूस,उत्कृष्ट चढाईपटू(रु.५१०० देवा ग्रुप बेलापूर पुरस्कृत )गणेश कांबळे या खेळाडूस, उत्कृष्ट पकडपटू (रु.५१०० साई फर्निचर, रामगड पुरस्कृत)अशी वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली.

विजेत्या संघांना व खेळाडूंना मेनरोड मित्र मंडळ, बेलापूर च्या सौजन्याने ट्रॉफी चे देखील वितरण करण्यात आले. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ महानंद चे चेअरमन, जिल्हा जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य राजेश परजणे, गणेश महाराज शिंदे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन पञकार देवीदास देसाई, संतोष मते,प्रविण जमधडे व प्रियंका यादव यांनी केले. तसेच एस.न्यूजचे जयेश सावंत व तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद यांनी स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण राजस्थानी गृह उद्योग, बेलापूर बु चे संचालक बाळूशेठ लड्डा यांच्या सौजन्याने केले.सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी गावकरी मंडळाचे सर्व सदस्य, बेलापूर कबड्डी संघाचे आजी-माजी खेळाडू बेलापुर ग्रामस्थ आदिंनी परिश्रम घेतले.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here