अहमदनगरमध्ये आप ला खिंडार का…? आपचे पदाधिकारी भाजप नेत्यांच्या संपर्कात.

0
711

श्रीरामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मध्ये इनकमिंग सुरू असून. भाजप अनेक ठिकाणी राजकीय भूकंपाच्या तैयारीत दिसत आहे. ज्यात अहमदनगर जिल्ह्या भाजप मय करण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राधाकृष्ण विखे पाटीलांनी आपली यंत्रणा कामाला लावली असून. अहमदनगर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे अनेक पदाधिकारी सध्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून हाती आली आहे. श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा भूमिपूजन कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आम आदमी कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भला मोठा हार घालून सत्कार केला. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी देखील एका कार्यक्रमास  महसूल मंत्री विखें पाटील यांच्या गाडीतुन आप चा मोठा पदाधिकारी फिरतांना पहायला मिळाल्याने, आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यातील आम आदमी पार्टीला खिंडार पडणार की काय अशा चर्चेला उधाण आलंय.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here