नगर नाशिकसह समाजवादी पार्टीच्या ४ जिल्ह्यातील सर्व समित्या बरखास्त – सिद्दीकी

0
804

श्रीरामपूर – २८ नोव्हेंबर २०२३ रोजी, मुंबई येथे समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची बैठक पारपडली. या बैठकीत राज्यातील पक्षाच्या वाढी संदर्भात, राज्यातील आवश्यक त्या सर्व जिल्हा समित्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर,धुळे,जळगाव,नंदुरबार व मालेगाव या जिल्ह्यातील. समाजवादी पार्टीच्या जिल्हा समित्या, महानगरपालिका समित्या, तालुका समित्या, नगरपालिका समित्या, म.न.पा. अन्य सर्व संबंधित  समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून. समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्रदेश कार्यआध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार व सर्व सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रक, पक्षाचे प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी यांनी प्रसिद्ध केले असून. सदरच्या सर्व समित्यांची पुनर्रचना करून. लवकरच पुनर्रचित समित्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील. प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी यांनी दिली आहे.

67% LikesVS
33% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here