जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या,सेनेचे आंदोलन.

0
291

श्रीरामपूर : यंदाच्या वर्षी पावसाने दांडी मारल्याने, पाण्याअभावी बाजरी,सोयाबीन,कपाशी,तूर या सारख्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने. काही शेतकऱ्यांना दुबार तर काही शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान आणि यंदाच्या वर्षी पावसा अभावी नुकसान. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन,मानसिक,आर्थिक संकटात सापडला असतांनाही. यासंदर्भात कोणतीही दखल घेण्यास, ना राज्य सरकारला,ना मंत्र्यांना, ना स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वेळ नसल्याने. राज्य शासनाने त्वरित श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा. तसेच दुष्काळग्रस्त भागासाठी असलेल्या शासकीय उपाय योजना,तालुक्यासह जिल्ह्यात राबवण्यात या मागणी करिता. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने श्रीरामपूर तहसीलदार प्रशासनास निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदनात मागण्यांसंदर्भात सकारात्मक कारवाई न झाल्यास,यापुढील आंदोलन शिवसेना स्टाईल करू असा इशारा देण्यात आला. सदरच्या आंदोलनास सेनेचे उपजिल्हा प्रमुख शेखर दुब्बैया,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर,शहराप्रमुख सचिन बडदे,जेष्ठ नेते अशोक थोरे,अरुण पाटील, सदा कराड, संजय छल्लारे, सुधीर वायखिंडे, विशाल पापडीवाल,उप शहर प्रमुख रोहित भोसले, सिद्धांत छल्लारे,रोहित नाईक, अतुल शेटे आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here