मयताच्या टाळूवरील तूप खाणारी लोकसेविका ५ हजारांची लाच घेतांना ताब्यात.

0
704

अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना प्राण गमवावे लागले, त्यांच्या करिता शासनाने विविध सवलती-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतांना. सुविधांच्या घेण्यासाठी येणा-यांची, मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार. लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे समोर आला आहे. ज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकांच्या पत्नीचा,कोरोना बाधित असल्याने,नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार होते. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला,त्यावेळी तक्रारदार शिक्षकाने स्वतः वैद्यकीय बिल भरून. त्यानंतर सदरचे बील जि प. मधुन मंजूर होऊन मिळणे करिता,आवश्यक कागदपत्रांसह प.स. श्रीरामपूर मार्फत जुलै २०२१ मध्ये दाखल केले. सदर बील मंजूर करणे करिता यातील आरोपी लोकसेविकेने तक्रारदारास,५ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या बाबत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, जि.प. शिक्षण विभागात सापळा लावून. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग वर्ग -३ मधील वरिष्ठ सहाय्यक,चंदा चंद्रकांत ढवळे यांना , मागणी केलेल्या ५ हजार रुपयांची लाच घेतांना, लोकसेविकेस लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून.

लोकसेविके विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने, यांच्या सूचना व आदेशानुसार,पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर ला.प्र.वि,पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे,पोलिस निरीक्षक शरद गोरडे ला.प्र.वि अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगुल, पोलीस नाईक रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, राधा खेमनर, हारून शेख आदींच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here