शाळेतील चिमुकल्यांनी साजरा केला जागतिक चिमणी दिन

0
752

इंदापूर प्रतिनिधी – पोपट बुनगे
बुनगे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
निसर्गामध्ये चिमणी हा पक्षी सर्व भारतभर आढळताना दिसतो. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे अन्य काही कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी तर चिमणीचे कार्य खूप मोठे आहे. छोटे छोटे किडे, अळी खाऊन हा जीव आपला जीवन प्रवास पूर्ण करत आहे.
चिमण्यांची संख्या वाढावी त्यांचे संवर्धन व्हावे या हेतूने शाळेत चिमणी पक्षाविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चिमण्यांसाठी घरटी तयार करून त्यांच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरटे देण्यात आली.
यासाठी शालेय परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश कदम, प्रमुख पाहुणे श्री सचिन मासाळ, श्री संकेत लोंढे, श्री संकल्प लोंढे सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण जौंजाळ यांनी केले तर आभार उपशिक्षक श्री दिलीप अभंग यांनी मानले.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here