नगरसेविका पुत्राला सुटला चाळा, रात्रीच्या वेळी महिलांचे दरवाजे वाजविण्याच्या केला चाळा.

0
3074

श्रीरामपूर : पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने, इच्छुक उमेदवारांसह सध्याचे नगरसेवक भागातील मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असतांना. शहरातील एका जेष्ठ नगरसेविकेच्या दिरा असतांनाही, दारूच्या नशेत येऊन, रात्री ११ च्या सुमारास प्रभागातील महिलांचे दरवाजे वाजून, त्यांना कॅडबरी देऊन लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार घडत असतांना. नगरसेविकेच्या दिराने एका दलित महिलेच्या घराचा दरवाजा देखील वाजवला. त्यावेळी सदर महिलेचा पती देखील घरात होता. नगरसेविकेच्या कुपुत्र दिराने आपल्या पत्नीशी असभ्य आणि गैरवर्तन करत असल्याचे त्याला सहन न झाल्याने.

त्या महिलेच्या पतीने त्या नगरसेविकेच्या कुपुत्र दिराची यथेच्छ धुलाई केली. यावेळी ज्या ज्या महिलांना नगरसेविकेच्या कुपुत्र दिराला छेडले होते. त्यापैकी काही महिलांनी देखील, त्यात हात साफ करून घेतले. हा घडलेला प्रकार जेव्हा नगरसेविकेच्या घरी समजला. दुसऱ्या दिवशी सकाळी झालेल्या प्रकारा संदर्भात, छेडछाड व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास जात असलेल्या, त्या दाम्पत्याचे हातपाय धरून, काही लोकांच्या तसेच राजकीय नेते मंडळींच्या मध्यस्थेने, तडजोड करून सदरच्या प्रकरणावर परदा टाकण्यात आला. मात्र रात्रीच्या अंधारत घडलेल्या त्या नगरसेविकेच्या कुपुत्र दिराने केलेल्या कुकृत्याची चर्चा, परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने, चर्चेला उधाण आले असून. यापूर्वी देखील नगरसेविकेच्या कुपुत्र दिराने ,दारूच्या नशेत अनेकदा असे प्रकार केल्याचे देखील समोर आल्याने. आगामी पालिका निवडणुकीत नगरसेविकेच्या उमेदवाराला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

89% LikesVS
11% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here