मासेमारीसाठी गेलेल्या गायकवाड दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू.

0
714

श्रीरामपूर तालुक्यातील, माळेवाडी येथे असलेल्या अशोक बंधाऱ्यातील तळ्यात, आज आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास, मांजाबापू भागवत गायकवाड वय वर्ष ३७ व सौ चंद्रकला मांजाबापू गायकवाड वय वर्ष ३० हे दोघे पती पत्नी मासेमारीसाठी गेले असता. पाण्याचा वाढत्या प्रवाहात दोघे पती पत्नी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून. बंधाऱ्या जवळील काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने, त्यांनी पोलीस पाटील तसेच तालुका पोलीस ठाण्यात याबाबत कळविले, त्यानंतर लागलीच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे हे पोलीस कर्मचारी व आपात्कालीन मदत दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले.

व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता , दोघांची शोधमोहीम सुरू केली असता. १ तासानंतर सौ चंद्रकला मांजाबापू गायकवाड यांचा मृतदेह मिळाला असून, मांजाबापू गायकवाड यांचा शोध सध्या सुरू आहे. या घटनेनंतर पोलीस व शोध पथकातील जवान घटनास्थळी तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here