व्यापा-यांवरील कारवाई संदर्भात नगराध्यक्षांचे जिल्हाधिका-यांना निवेदन.

0
392

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मागील काही दिवसांपासून, शासनाच्या निर्देशानुसार सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, बाजारपेठ तसेच दुकाने खुली ठेवण्याचे निर्देश दिलेले असतांना, शहरात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर, महसूल पोलीस व पालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई, तसेच वारंवार सांगून देखील दुकाने खुली ठेवल्यास, सदरची दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात, श्रीरामपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन, यापूर्वीच दर रविवारी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्यु पाळावा असे अवाहन केलेले होते.


त्यास व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद देऊन प्रशासनास सहाकार्य केले आहे. मात्र गेल्या ५ ते ६ दिवसांपासून प्रशासनामार्फत श्रीरामपूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्यामुळे सर्व छोटया मोठ्या व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहेत. दुकानांच्या वेळा कमी केल्या असल्या तरी व्यापारी बांधव प्रशासनास सहकार्य करत आहे. त्यामुळे दुकाने सील करण्यापूर्वी दुकानदारांना पूर्वसुचना द्यावी, एखाद्या व्यापाऱ्याचा माल (किराणा व इतर) प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर जर दुकानात उतरविण्यात येत असेल त्यावेळी दुकानदारांना सवलत दिली गेली पाहिजे. तसेच जी दुकाने सील केलेली आहेत ती तातडीने उघडुन द्यावीत. अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदना द्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, नगरसेविका वैशाली चव्हाण, अलतमश पटेल, रोहित शिंदे, तसेच शहरातील व्यापारी उपस्थितीत होते.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here