शासकीय जागेत अनधिकृत वृक्षतोड, विजेचा खांब पडल्याने २ मुले गंभीर जखमी.

0
681

श्रीरामपूर – शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरातील, पाटबंधारे विभागाच्या हद्दीत असलेल्या, हनुमान मंदिर प्रशासनाच्या भोंगला कारभारामुळे, सकाळी १० वाजेच्या सुमारास विजेचा खांब पडल्याने अपघात झाला, सदरच्या अपघातात १४ ते १५ वयोगटातील २ मुले, गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या, शासकीय जागेत असलेल्या हनुमान मंदिरातील व्यवस्थापकांनी, कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा पूर्व सूचना न देता, मंदिराच्या मागील बाजूस असलेले वडाचे झाड, तोडण्याचे अनाधिकृत काम, उत्तम साळवे व दत्तात्रय ब्राम्हणे नावाच्या झाड तोडणाऱ्यांना दिले होते. २ दिवसांपासून झाड तोडण्याचे काम सुरू असतांना, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास, मंदिरा मागील झाड तोडत असतांना, केलेल्या हलगर्जीपणामुळे, झाडाची फांदी तुटून ती विजेच्या तारीवर पडली, आणि पालिकेच्या मालकीचा असलेला खांब, कोसळून तेथून सायकलीवर जात असलेल्या, रेहान सादिक बागवान राहणार मिल्लतनगर, व साईराज दिलीप दाभाडे राहणार सूतगिरणी या दोन्ही मुलांच्या अंगावर पडला.

त्यामुळे दोन्ही मुलांना मोठ्या प्रमाणात इजा झाली असून, सायकलचा अक्षरशः चुरा झाला आहे. हा प्रकार घडताच, झाड तोडणारे पळून गेले. यासंदर्भात समजताच पाटबंधारे विभागाचे कॉलनीतील नागरिक, तसेच परिसरातील नागरिक त्याठिकाणी जमा झाले, यावेळी जखमी अवस्थेतील मुलांना, युवा नेते राहुल शिंपी यांनी तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले, तसेच महावितरणचे कर्मचारी सागर गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी, क्षणाचाही विलंब न करता अपघाताच्या ठिकाणी येऊन विद्यूत प्रवाह बंद केला. मात्र या दुर्घटनेस जबाबदार कोण, पाटबंधारे विभाग, मंदिर प्रशासन, की झाड तोडणारा ठेकेदार. असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात असून. अवैध वृक्षतोड व आपघाता संदर्भात संबधित विभाग कायदेशीर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here