साई संस्थानचे पाचवे (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बानायत यांनी स्वीकारला पदभार

0
348

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य सरकारने सोमवारी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती केली आहे. साई संस्थानचे पाचवे (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बानायत यांनी आज पोळा सणाच्या मुहूर्तावर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी
अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नागपुर येथील बानायत रेशीम उद्योग विभागाच्या संचालक या पदावरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना साई दर्शन व्यवस्थित तसेच जास्तीत जास्त सेवा व सुविधा कशा देता येतील याकडे माझे विशेष लक्ष असणार असल्याचे यावेळी बानायत म्हणाल्या. त्याच बरोबर कोरोनामुळे शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी याचा पूर्ण अभ्यास करून येणा-या भाविकांना साई दर्शन त्याच बरोबर , निवास , भोजन आदी व्यवस्था करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

कोरोणाचा महामारी काळात सार्ई संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पीटल व श्री साईनाथ रूग्णालयामध्ये जास्तीत जास्त रूग्णांना सुलभ पध्दतीने सेवा कशी देता येईल याकरीता प्रयत्न करणार असुन संस्थानचा सर्व कारभार यापूर्वी प्रमाणेच सुव्यवस्थितपणे सुरू राहील याकरीता नेहमी
प्रयत्नशील राहणार. त्याच बरोबर संस्थानचे सुरू असलेले प्रकल्प व नियोजीत प्रकल्प याचा पूर्ण अभ्यास करून लवकरात लवकर पूर्ण करण्याकरीता प्रयत्न करणार असुन श्री साईबाबांचे जीवनचरित्र व शिकवण याचा प्रचार प्रसार करण्याकरीता नेहमीच प्रयत्नशिल राहणार असल्याच यावेळी भाग्यश्री बानायत-धिवरे म्हणाल्या आहे.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here