सर्वसाधारण सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्या काँग्रेस नगरसेवकांची मागणी.

0
477

श्रीरामपूर : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. त्याठिकाणी शेकडो आमदार तसेच अधिकारी उपस्थितीत राहू शकतात, त्याच बरोबर सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीत, जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्णतः खुली करण्यात आल्याने, दररोज हजारो नागरिकांचे व्यवहार सुरळीत सुरू झाले करीत आहेत. लग्न समारंभास देखील ५० लोकांची परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर अहमदनगर जिल्हा परिषदेसारख्या ठिकाणी, ७० हून अधिक सदस्य, अधिकारी, कर्मचारी असे १५० पेक्षा जास्त लोक, सर्व साधारण सभेत सहभाग घेऊ शकतात. मग श्रीरामपूर नगरपरिषदेची सर्व साधारण, ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावी. कारण पालिकेच्या माध्यमातून घेतल्या जाणा-या ऑनलाईन सभेत. आवाज न येणे, विषय न मांडता येणे, गोंधळ होणे, विरोधकांचा आवाज बंद करणे, असे प्रकार होत असतात. आतापर्यंत झालेल्या ऑनलाईन सभेत, जाणून बुजून विरोधकांचे आवाज बंद करणे, त्यांना ऑनलाईन मिटिंग मधून काढून टाकणे असे प्रकार घडत असल्याने. आपल्या पालिकेत ३१ नगरसेवक तसेच १० अधिकारी, तसेच काही पत्रकार असे ५० च्या आत असल्याने, १२ जुलै २०२१ रोजी होणारी. पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावी. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या विषयावर सविस्तर चर्चा होईल. त्यातून विविध विकासात्मक कामे घेता येतील व विकासाचे धोरण ठरवता येईल. त्यामुळे १२ जुलै रोजी होणाऱ्या पालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेस उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी विरोध दर्शवित. ही सभा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी. अशा मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी, मुख्याधिकारी यांना निवेदना मार्फत केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, बनगरसेवक संजय फंड, मुज्जफर शेख, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मनोज लबडे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, सुहास परदेशी, सचिन गुजर, आदी उपस्थितीत होते.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here