सनफ्रेश अँग्रोच्या बायोगॅस प्रकल्प सेवेचा फायदा घेऊन, दूध उत्पादन खर्च कमी करा – राजीवजी मित्रा…

0
1047

संगमनेर – १८ एप्रिल २०२३ रोजी संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी, प्रभात डेअरी मार्फत दूध उत्पादकांसाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प उद्घाटन, दूध उत्पादक शेतकरी मेळावा व मार्गदर्शन चर्चासत्र” आयोजित करण्यात आलेले होते याप्रसंगी बोलताना सनफ्रेश अँग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजीवजी मित्रा साहेब यांनी दूध उत्पादकांसाठी लॅक्टालीस या आंतरराष्ट्रीय ग्रुपने सनफ्रेश अँग्रो इंडस्ट्रीज च्या माध्यमातून प्रभात डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व दूध उत्पादकांची व्यवसायामध्ये प्रति लिटर दूध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प, राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व मिनरल मिक्शचर अशा प्रकारच्या विविध विस्तार सेवेच्या माध्यमातून उत्पादकांचा प्रति लिटर दूध उत्पादन खर्च कमी होणार असल्याचे वक्तव्य केले. त्यासाठी पंचक्रोशीतील सर्व दूध उत्पादकांनी सनफ्रेश अँग्रोमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असेही आव्हान याप्रसंगी त्यांनी केले तसेच याप्रसंगी डॉक्टर खोमणे यांनी दूध उत्पादकांनी आधुनिक पद्धतीने व्यवसायामध्ये कशाप्रकारे बदल करायचा याविषयी अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात डेअरीचे दूध संकलन विभागाचे ऊपमहाव्यवस्थापक श्री कल्पेश तक्ते साहेब यांनी केले त्यांनी कार्यक्रमासाठी ज्यांचा व्यवसायामध्ये मोलाचा सहभाग असतो अशा दूध उत्पादक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व प्रभातच्या विविध सेवा सुविधा प्रत्येक दूध उत्पादकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले,तसेच संगमनेर पंचायत समिती सदस्य श्री अशोक सातपुते साहेब यांनी प्रभात डेअरीच्या माध्यमातून चालवणाऱ्या सर्व सेवा सुविधा व पंचक्रोशीतील सर्व दूध उत्पादकांच्या व्यवसायामध्ये पारदर्शक काम प्रभात डेअरी सातत्याने करत आलेली आहे असे गौरवोउद्गागार काढले व पंचक्रोशीतील दूध उत्पादकांना देखील प्रभात डेअरीस दूध पुरवठा करण्यासाठी सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया चे श्री मनोज मोरे साहेब यांनी सनफ्रेश अँग्रो व एसबीआय मार्फत चालवण्यात येणाऱ्या कर्ज वितरणा संदर्भात माहिती दिली व त्याचप्रमाणे एचडीएफसी चे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री शिरीष शिंदे साहेब यांनी देखील याप्रसंगी सनफ्रेशच्या च्या उत्पादकांना बँकेमार्फत कर्ज पुरवठा करणार असल्याचे वक्तव्य केले याप्रसंगी सनफ्रेश अँग्रो चे दूध संकलन विभागाचे मुख्य अधिकारी श्री अतुल नाकरा, श्री कल्पेश तक्ते, श्री किरण मराठे, श्री रमेश कनीचे, श्री विशाल आहेर, श्री संतोष ब्राह्मणे ,श्री धनंजय चोळके श्री ज्ञानेश्वर ऊर्हे,श्री सतीश दारकुंडे, श्री किरण शिंदे ,संजय अनार्थे,श्री सागर थोरात, दूध संकलन विभागाचे विविध भागातील विभागीय मॅनेजर व फिल्ड ऑफिसर तसेच विस्तार विभागाचे प्रमुख श्री सुकांत पाढी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बी एस गुंड, डॉ.एम बी शिंदे, डॉ. शरद शिंदे, श्री माऊली पवार व विस्तार अधिकारी, विविध भागातील प्रभातला दूध पुरवठा करणारे सर्व दूध शितकरण केंद्र चालक, पंचक्रोशीतील सरपंच ,उपसरपंच, विविध संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच हजारोच्या संख्येने पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात सर्व दूध उत्पादक महिला व पुरुष याप्रसंगी उपस्थित होते. तसेच सर्व दूध उत्पादकांसाठी प्रभात डेअरीमार्फत विविध कंपन्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा सुविधा च्या स्टॉल मध्ये देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दूध संकलन विभागाचे मुख्य अधिकारी श्री अतुल नाकरा साहेब यांनी केले व कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे व सनफ्रेश अँग्रो व्यवस्थापनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले व सर्व दूध उत्पादकांना उत्तम भोजन करून जाण्यासाठी आव्हान देखील केले.

80% LikesVS
20% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here