मोठी बातमी : श्रीरामपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचे १३० सदस्य बाजार समिती मतदानास मुकणार…

बाजार समितीच्या उमेदवारीसाठी तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड....

0
587

श्रीरामपूर (प्रतिनिधी बाबासाहेब चेडे)श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली त्यानंतर अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आली सदर तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांनी सदर सदर मतदार यादीतून तालुक्यातील उदिरगाव, शिरसगाव, उक्कलगाव, निमगाव खैरी, भोकर, फत्याबाद, खिर्डी, कान्हेगाव, गुजरवाडी, माळवाडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांची नावे वगळण्याबाबत आदेश दिला आहे त्यामुळे बाजार समिती साठी इच्छुक असलेल्या अनेक मातब्बरांचा हिरमोड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकीबरोबरच श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. तसा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दोन दिवसानंतर म्हणजेच २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. असे असताना हा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे मागणी करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर असून प्रशासक असलेल्या १० ग्रामपंचायतींच्या सदस्यांना या मतदान प्रक्रियेस मुकावे लागण्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे, त्यामुळे सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी देखील यावेळी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. तालुक्यातील माळवाडगाव येथील रहिवासी प्रदीप आसने यांनी ही मागणी केली आहे.

त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असल्याने तेथे प्रशासकराज आहे. त्यामुळे सदस्य मंडळ अस्तित्वात नाही जुन्या सदस्यांना मताधिकार नसणार. कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना मताधिकार देने बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे सुमारे १३० सदस्यांना यातून वगळले गेले असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत हमाल मापाडी आणि व्यापारी मतदारसंघाच्या मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदीप आसने यांनी सदर बाबतीत श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालय येथून तालुक्यातील प्रशासक आलेल्या ग्रामपंचायतीची माहिती घेऊन सदर निवडणूक कार्यक्रम हा बेकायदेशीर असल्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक सहकारी प्राधिकरणाकडे सादर केली. त्यामुळे राज्य निवडणूक प्राधिकरणाला जाग आली असून त्यानंतर त्यांनी सदर मतदार यादीमधून प्रशासक असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे श्रीरामपूर बाजार समितीच्या मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सदर निवडणुकीत प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतीवरील सदस्य मतदानापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर प्रमाणे जिल्ह्यातील व राज्यातील इतर कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीची स्थिती काय आहे. कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना वगळण्याचा निर्णय झाल्याने तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचे सुमारे १३० सदस्य या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणार आहे, ते संविधानास धरून नाही त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरनाच्या निर्णयाकडे श्रीरामपूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.

चौकट – उमेदवारी दाखल करण्यास अवघे काही तासच शिल्लक असतानाच मतदार यादीतून नावे वगळल्याने यासंबंधी न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here