ख्रिश्चन समाजावरील अत्याचारा विरोधात श्रीरामपूरात सकल मुकमोर्चा.

0
1270

श्रीरामपूर : सध्या ख्रिश्चन धर्मगुरूवर होणारे हल्ले,धर्मांतराच्या नावाखाली होणारी विनाकारण बदनामीच्या निषेधार्थ, श्रीरामपूर तालुक्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. श्रीरामपूर शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मुकमोर्चा. मेनरोड,छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती या ठिकाणी धडकला. यावेळी ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय, धर्मगुरूंवर होणारे हल्ले,चर्चवर होणारे हल्ले,धार्मिक विंधीची विटंबना,धर्मांतर प्रकरणी दाखल केले जाणारे खोटे गुन्हे,हे सर्व प्रकार थांबवावेत, याकरिता तहसिलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या भव्य मुकमोर्चात लोयोला चर्च श्रीरामपूर, सेंट झेवियर चर्च टिळकनगर, संत तेरेसा चर्च हरेगाव,ऑल पास्टर्स फेलोशिप श्रीरामपूर, न्युज लाईफ पास्टरर्स व रेव्ह.फेलोशिप श्रीरामपूर, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ महाराष्ट्र, अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद, मेथाडिस्ट चर्च ,सेव्हन्थ डे चर्च ,सर्व्हेशन आर्मी ,राष्ट्रीय ख्रिस्ती आघाडी,संत लूक हॉस्पिटल ,कनोसा हॉस्टेल , टिळकनगर सिस्टर श्रीरामपूर यांच्यासह सर्व ख्रिस्ती धर्मगुरुंसह,विविध राजकीय पक्ष, सामजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी सहभाग नोंदवीला.

तसेच फादर ज्यो गायकवाड ,पास्टर राजेश कर्डक, रावसाहेब त्रिभुवन,ख्रिस्ती सेनेचे अध्यक्ष प्रवीण राजे शिंदे,महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले व सालोमन गायकवाड, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश दादा थोरात, पास्टर शमुवेल साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सरचिटणीस दीपक साठे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी वंचित बहुजन आघाडीचे शरण त्रिभुवन अहमदनगर शिवसेना उपशहर प्रमुख चंद्रकांत उजागरे, तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,सचिन गुजर, मुस्लिम समाजाचे मौलाना शहर काजी अकबर अली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष लकी सेठी, आरपीआयचे प्रमुख भीमा बागुल, एडवोकेट जोस्ना कदम आदींनी भाषणे करून पाठिंबा दिला.

82% LikesVS
18% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here