वडाळा महादेव गावाला शिवकालीन ऐतिहासिक इतिहास – डॉ अनिल पाटील.

0
291

श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मृतीस्थळ उद्घाटन सोहळा तसेच विविध कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हाताने, या ठिकाणी शैक्षणिक मंदिराची मुहूर्तमेढ रवल्या गेली, त्याचे नातू व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील यांच्या शुभहस्ते, कर्मवीर अण्णांच्या स्मृतीस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर पाटील यांनी वडाळा महादेव गावाला शिवकालीन ऐतिहासिक इतिहासअसले बाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर शेतीविषयक डिजिटल असे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्नशील आहे शिक्षण क्षेत्रात सध्या अमुलाग्र बदल होत असताना रयत शिक्षण संस्थेने अंगणवाडी पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्लोबल पद्धतीचे शिक्षण देण्याचे नवीन धोरण स्वीकारले आहे. फाली या माध्यमातून कृषी विषयक माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहेत वडाळा महादेव येथील शेती विभागात मोठा बदल झाला असून सध्या भरघोस उत्पन्न विकासात वाढ झाली आहे या ठिकाणी संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे सहकार्य संस्थेस लाभत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी अहमदनगर जिल्ह्याचे मोठे योगदान असून या परिसरास आई म्हणून आपणास जनरल बॉडी सदस्या मीनाताई जगधने लाभलेल्या आहेत संस्थेच्या या परंपरेमध्ये कुणी छोटा नाही तर कुणी मोठा ही नाही या माध्यमातून अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले आहेत येथील ग्रामस्थांचे शाळेसाठी मोठे सहकार्य लाभत आहेत अण्णांचा या परिसरामध्ये सततचा वावर होता बहुजन गोरगरीब मुले शिकले पाहिजे हा अण्णांचा खरा उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मण कन्हेरकर सर यांनी केले शाळेच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला येथील जेष्ठ देणगीदार सी वाय पवार यांनी मनोगत व्यक्त करत अण्णांच्या आठवणीस उजाळा दिला तसेच शाळेतील बदलाविषयी माहिती दिली
सुनील कुदळे यांनी मनोगत व्यक्त करत स्मृतिस्थळाबाबत कमान फलक दिशादर्शक बोर्ड लावावे अशी सूचना मांडली. जनरल बॉडी सदस्य मीनाताई जगधने यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असताना रयत शिक्षण संस्था जगाच्या बरोबर असणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनाबरोबर बौद्धिक कृषी ज्ञान विकसित होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत येथील ग्रामस्थांचे तसेच शिक्षकांचे संस्थेस चांगले सहकार्य लाभत आहेत उपशिक्षक बाळासाहेब कसार यांनी पेव्हिंग ब्लॉक साठी पन्नास हजार रुपये कन्हेरकर सर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे साठी पंचवीस हजार रुपये व निंभोरे सर यांनी पंधरा हजार रुपये धनादेश विकास कामासाठी सुपूर्त केला. फाली बिजनेस प्लॅन मिनी गुरुकुल यासाठी संस्था प्रयत्नशील असून वडाळा महादेव हे माझे दुसरे माहेर असल्याचे प्रतिपादन जनरल बॉडी सदस्य मीनाताई जगधने यांनी केले. यावेळी संस्थेचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे आरबीएनबी कॉलेजचे डॉ प्रवीण बडदे सि डी जैन कॉलेजचे डॉ सुहास निंबाळकर बी एड कॉलेजचे डॉ मुकुंद पोंधे सरपंच कृष्णा पवार सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव पवार स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुधीर पाटील कसार शेती विभाग प्रा एकनाथ औटी अशोक सहकारी साखर कारखाना संचालक रामभाऊ कसार विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन अनिल पवार तसेच श्रीरामपूर परिसरातील सर्व रयत सेवक ग्रामपंचायत सर्व सदस्य पदाधिकारी विविध कार्यकारी सोसायटी सर्व संचालक ग्रामस्थ विद्यार्थी पालक ज्येष्ठ शिक्षक पोपट घोडके संतोष नेहुल भास्कर सदगीर श्रीमती जोस्ना कोहकडे स्वेजल रसाळ दिपाली सोनवणे सुजाता बोरावके अशोक पवार प्रशांत बांडे अविनाश लाटे आदी शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते। सूत्रसंचालन शीतल निंभोरे प्रज्ञा कसार यांनी केले तर आभार भास्कर सदगीर यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here