पालिका पोलिसांची प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण मोहीमेसह दंडात्मक कारवाई.

0
3156

श्रीरामपूर : शहरातील बाजरपेठ असलेल्या,छ्त्रपती शिवाजी महाराज रोड तसेच मेन रोड परिसरात विविध बँका,दवाखाने यासह विविध कार्यालये असल्याने, या मार्गांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु शहरातील अनेक व्यापा-यांनी आपले दुकाने रस्तावर थाटले आहेत, तसेच रस्त्यावरील हातगाडी व दुकानींमुळे या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. यासंदर्भात पालिकेने कारवाई करायची कि पोलिसांनी, हा प्रश्न निर्माण झाल्याने. अनेकांनी याचा गैरफायदा घेऊन शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत असल्याने. शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी पालिका प्रशासन व शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई हाती घेतली असून.

रस्त्यांवर अतिक्रम कारणा-यांवर जप्तीसह दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. ज्यात नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल,तसेच रस्त्यांवर अस्थव्यस्थ वाहने लावणा-यांनी,वेळीच सतर्क होऊन पालिका आणि पोलीस प्रशासणास सहकार्य करावे, अन्यथा दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिला आहे.पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहीमेत, पोलीस उप निरीक्षक स्वाती देवरे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल पाटील,पोलीस उप निरीक्षक समाधान सुरवाडे,पोलीस कर्मचारी लाला पटेल,राहुल नरवडे,अतुल लोटक, रघुवीर कारखिले,गौरव दुर्गुळे,करमळ,वाहतूक शाखेचे साजिद शेख,पालिकेचे अतिक्रमण विभागाचे संजय शेळके, सुनील केदारी,अमन साळवे,संतोष ढगळे आदी उपस्थित होते.

86% LikesVS
14% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here