शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रासाठी घातक तर गुजरातसाठी लाभदायक:-दत्ता मोहळकर…

0
1453

शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रासाठी घातक तर गुजरातसाठी लाभदायक:-दत्ता मोहळकर…

एक लाख रोजगार देणारा वेदांत प्रकल्प गुजरातला हलविल्याने युवा सेना आक्रमक…

निलंगा प्रतिनिधि:-
महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेच्या आधारे सुमारे बारा कोटी २० लाख लोकसंख्या राज्यात असून आजतागायत लोकसंख्येचा आकडा वाढलं असावं सहाजिकच आहे लोकसंख्या वाढली तर कंपन्या, संस्था,प्रकल्प ही वाढणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात कंपन्या उभे राहिल्यास संबंधित कंपन्याच्या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधरू शकेल. मात्र वेदांत चा एवढा मोठा एक लाख रोजगार उपलब्ध करून देणारा महाराष्ट्राच्या हिताचा प्रकल्प गुजरातला हलवून शिंदे-फडणवीस सरकारने हे हे दाखवून दिले ही आमचा ईडी सरकार दिल्लीचीच गुलामी करणार असून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय न घेता गुजरातमध्ये विकास कामे करून दिल्लीपुढे महाराष्ट्राला झुकवण्याचा घाट शिंदे-फडणवीस खोके सरकार करत असल्याचं आरोप युवा सेनेच्या जिल्हा समन्यवक दत्ता मोहळकर यांनी केला आहे. निलंगा येथे युवा सेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौक येथे शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णया विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यात शिवसैनिका सह हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांनी स्वाक्षऱ्या करून सहभाग नोंदवला.
यावेळी राणा आर्य, पृथ्वीराज निंबाळकर, आदित्य कमले, गजानन बऱ्हाणपूरे, अमोल सूर्यवंशी, ऋषी मोहळकर,अमोल पाटील, अजय ढवळे, भरत चव्हाण, अजिंक्य लोंढे, विशाल नेलवाडे, सुदर्शन शिंदे, सचिन मोहळकर,अजय वडणे, सूरज शेळके, पायल पेठकर, मोहिनी दवणे, वैशाली जाधव, राजनंदनी मुळे, नागिनी बिराजदार आदी शिवसैनिक स्वाक्षरी आंदोलनात सहभागी होते..……

92% LikesVS
8% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here