या गावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वर्षाचा नर बिबट्या जागीच ठार

0
494

राहाता(प्रतिनिधी) तालुक्यातील हणमंतगाव येथे
लोणी सोनगाव रस्त्यावर ब्राह्मणे बनसोडे वस्ती जवळ आज शनिवार दिनांक 19/6/21 रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वर्षाचा नर बिबट्या जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती नगरचे उपवसंरक्षक आधिकारी सौ. माने मॅडम, सहाय्यक उपवसंरक्षक आधिकरी रमेश देवखुळे, कोपरगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील मॅडम, वनपाल बी एस गाढे, यांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक जी बी सुरासे घटनास्थळी येऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला.कोल्हारचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खपके यांनी मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी करून रावसाहेब ब्राह्मणे यांच्या गट नं 200 मध्येअग्नी दिला.
या प्रसंगी प्रविण विखे, देविदास म्हस्के, दीपक घोलप, प्रवीण ब्राह्मणे, वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के पंच म्हणून हजर होते.

50% LikesVS
50% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here