माळवाडगावात गोठ्यात बांधलेल्या शेळीची चोरी,पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी.

0
1140

श्रीरामपूर/प्रतिनिधी माळवाडगांव येथील घराजवळ असलेल्या बंदिस्त शेडमध्ये चार शेळ्या,दोन बकरे व एक गाय बांधलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी शेडमधून एक शेळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर काही दिवसांवर असताना ही चोरी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळवाडगांव येथील खडकवस्ती रोडलगत गोकुळ बाबुराव आसने हे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे चार शेळ्या,दोन बकरे,एक गाय, कालवड असून त्यांनी २९ डिसेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या व बकरे घराजवळ असलेल्या बंदिस्त शेडमध्ये बांधले होते. मध्यरात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने गोकुळ आसने यांना जाग आल्यावर त्यांनी शेडमध्ये पाहिले असता शेडचे गेट उघडलेले दिसल्याने त्यांनी शेडमध्ये पाहिले असता शेडमध्ये बांधलेले शेळ्या व बकरे जागेवर दिसले नाही तसेच एका शेळीची दोरी कापलेली आढळून आली त्यामुळे शेळ्यांची चोरी झाल्याची शंका आल्याने.आसने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता तीन शेळ्या व बकरे घराजवळ आढळून आले मात्र एक शेळी मिळून आली नाही. शेतक-यांनी जीवापाड जपलेल्या शेळ्या बोकडांच्या होत असणा-या चो-यांमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.त्यामुळे भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

चौकट – पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी…
माळवाडगांव परिसरात मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरीच्या घटनेत वाढ झाली असून पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी माळवाडगांव परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here