ससाणेंच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात,ससाणे – मुरकुटेंच्या प्रेमाची उधळण.

0
3288

अहमदनगर – श्रीरामपूर शहराच्या विकासात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्या नावाशिवाय श्रीरामपूरची ओळख जगभरात झाली. ते म्हणजे स्वर्गीय माजी आमदार, व शिर्डी साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष, जयंतराव ससाणे. यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा स्वर्गीय ससाणें यांनी सुरू केलेल्या, दिवाळी फराळ कार्यक्रम त्यांचे सुपुत्र व उपनगराध्यक्ष करण ससाणे, आमदार लहू कानडे तसेच काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे,शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, भाजपाचे गणेश राठी, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, आप चे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल,आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी, हजेरी लावल्याने, आगामी पालिका निवडणुकीतील युतीचे संकेत दिले आहेत.

यापूर्वी माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष तालुक्यातील जनतेने जवळून पाहिला आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधकांच्या भूमिकेतील ताप देखील, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा चांगलाच अनुभवलाही, मात्र १ ते दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, ससाणे – मुरकुटे वादात हस्तक्षेप करून,उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून, त्यानंतर ससाणे – मुरकुटे यांच्यात नव्या मैत्रीच्या पर्वास सुरवात झाली. एवढेच नाही तर काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या, दिवाळी फराळ कार्यक्रमासही माजी आमदार मुरकुटे यांनी हजेरी लावल्याने. येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या, नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने, दिवाळी फराळातील ‘गोड’ राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे.

60% LikesVS
40% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here