महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने सौरभ कदम यांचा सत्कार.

0
903

श्रीरामपूर – महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद श्रीरामपूर , काँग्रेस अल्पसंख्याक विभाग , काँग्रेस अनुसूचित जाती विभाग शहर व तालुका यांच्या वतीने , व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने नोबेल पुरस्कार विजेत्या थोर समाजसेविका स्वर्गीय मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात राज्यस्तरीय खेळाडू व श्रीरामपूरचा धावपटू कु. सौरभ राजेंद्र कदम याची एन.आय.एस . ( अॅथलेटिक्स) साठी निवड होऊन प्रमाणित प्रशिक्षक झाल्याबद्दल त्याचा सत्कार व अभिनंदन श्रीरामपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदारा लहुजी कानडे , तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे , श्रीरामपूर धर्म ग्रामा चे प्रमुख धर्मगुरू फादर ज्यो. गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी फादर मॅथ्यू , सिस्टर ग्रेसि , सिस्टर पाकोळी , सिस्टर जॅकलीन , सिस्टर फातिमा , सुभाष तोरणे , दीपक कदम , विजय बोर्डे सर , सुरेश ठुबे , रितेश एडके , वैभव पंडित , प्रकाश निकाळे सर , अजित सुडगे, शंकर शिवदे , विश्वास अमोलिक , कमलाकर पंडित , जॉन धीवर,राकेश दुशिंग, चंद्रकांत चित्ते , संजय भिसे सर, इग्नाती रुपटक्के , अविनाश काळे , अशोक साळवे , विजय त्रिभुवन , प्रकाश लोखंडे , जॉन लोखंडे , डॅनियल साळवे, दिलीप सगगिळे निशिकांत पंडित , राहुल बागुल , जेम्स पंडित ,रावसाहेब आल्हाट राजेंद्र कदम सर व श्रीरामपूर परिसरातील ख्रिस्ती भाविक उपस्थित होते त्याप्रसंगी आमदार कानडे साहेब यांनी प्रशिक्षक सौरभ कदम यास खेळाडूंचा विकास करण्यासाठी व उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here